विद्याभूषण कोचिंग क्लासेस

प्रिय पालक व विद्यार्थी मित्रानों ,

शिक्षणाच्या विशाल आभाळाला गवसणी घालण्याची तुमची असीम महत्वाकांक्षा पाहून त्या महत्वाकांक्षेला गरज आहे ती अचूक व योग्य मार्गदर्शनाची! आज पर्यन्त आम्हाला तुमच्या उदंड प्रतिसादाचे पाठबळ लाभले त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद!
शैक्षणिक जीवनात यशस्वी होण्यासाठी एक सजग पालक म्हणून मी माझ्या पाल्यासाठी कोणत्या क्लासची निवड करू? तुमच्या या प्रश्नाला समर्पक उत्तर देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे . आणि त्यात पूर्णतः यशस्वी झालो देखील ! यावेळी देखील याच प्रश्नाच सखोल उत्तर देण्याचा यथाशक्ती केलेला हा प्रयास !
मुलांमध्ये संस्कार, सामाजिक जाणीव, राष्ट्र प्रेम, संस्कृती प्रेम रुजवण्यासाठी ; “आई संस्कृती-संस्कार” विचारमंचाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. पालक आणि विध्यार्थी मित्रानों, हे स्पर्धेचे युग आहे. ही स्पर्धा जीवघेणी न ठरता त्या स्पर्धेला तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे जाण्यासाठी पुढे केलेला हा एक मैत्रीचा हात आहे. हा एक सुसंवाद आहे तुमच्या उत्कर्षासाठी केलेला. अल्प मूल्यात अधिकाधिक मार्गदर्शन करण्याचा वसा आजही आम्ही जपला  आहे. याचं समाधान वाटते. आणि यामुळेच तुमच्यासाठी काहीतरी नित्यनूतन करण्याचे मनसुबे रचत असतो आणि ते जसेच्या तसे पारही पाडत असतो.

All rights reserved by Vidyabhushan Academy, Pune developed by GlobalCluster Technologies Pvt. Ltd.